Marathi Kavita Prem 2021
तुळशीपुढे दिवा लावताना
💗💗💗
तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं
💓💓💓
मी येऊ शकले नाही, कारण
💗💗💗
मध्ये कुंपण उभं राहिलं...
तुळशीपुढे दिवा लावताना
तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं
मी येऊ शकले नाही, कारण
मध्ये कुंपण उभं राहिलं...
तू माझं असणं
💓💓💓
किती छान आहे,
💗💗💗
नाहीतर हे जग म्हणजे
💓💓💓
नुसतंच माणसांचं रान आहे
तू माझं असणं
किती छान आहे,
नाहीतर हे जग म्हणजे
नुसतंच माणसांचं रान आहे..
ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे
💗💗💗
तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही
💓💓💓
मी ही म्हणतो जाऊदे
💓💓💓
मी 'त्या'चं मन मोडत नाही.
ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे
तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही
मी ही म्हणतो जाऊदे
मी 'त्या'चं मन मोडत नाही.
उमलणं आणि फुलणं
💗💗💗
यांत बरंच अंतर आहे
💓💓💓
उमलणं अगदी स्वाभाविक आहे
💗💗💗
फुलणं त्यानंतर आहे.
उमलणं आणि फुलणं
यांत बरंच अंतर आहे
उमलणं अगदी स्वाभाविक आहे
फुलणं त्यानंतर आहे.
तुझ्यावर रागावणं हा
💗💗💗
तुला आठवण्याचा बहाणा आहे
💓💓💓
तू आलास की तो जातो
💗💗💗
तसा माझा राग शहाणा आहे.
तुझ्यावर रागावणं हा
तुला आठवण्याचा बहाणा आहे
तू आलास की तो जातो
तसा माझा राग शहाणा आहे.
तेव्हा मी मनापेक्षा
💓💓💓
पावलांनाच आवरायला हवं होतं
💗💗💗
कारण मनाचं बहकणं नेहमीचं
💓💓💓
पावलांचं बहकणं नवं होतं.
तेव्हा मी मनापेक्षा
पावलांनाच आवरायला हवं होतं
कारण मनाचं बहकणं नेहमीचं
पावलांचं बहकणं नवं होतं.
.
मला वाटलंच होतं मला पाहिल्यावर
💓💓💓
तू मागे वळून पाहशील
💗💗💗
वळून पाहण्याइतकी
💓💓💓
तू नक्कीच माझी राहशील.
मला वाटलंच होतं मला पाहिल्यावर
तू मागे वळून पाहशील
वळून पाहण्याइतकी
तू नक्कीच माझी राहशील.
तू विझत असताना तुझ्याभोवती
💗💗💗
मी ओंजळ धरली
💓💓💓
तू तेवत राहिलास नि प्रकाशाने
💗💗💗
माझी ओंजळ भरली.
तू विझत असताना तुझ्याभोवती
मी ओंजळ धरली
तू तेवत राहिलास नि प्रकाशाने
माझी ओंजळ भरली.
सगळीच वादळं मी
💓💓💓
खिडकीत बसून पाहिली
💗💗💗
पण परवाच्या वादळात
💓💓💓
माझी खिडकीच वाहिली.
सगळीच वादळं मी
खिडकीत बसून पाहिली
पण परवाच्या वादळात
माझी खिडकीच वाहिली.
आता मलाही लागलंय जमायला
💓💓💓
तुझ्यासारखं वागणं
💗💗💗
समोर असलं की गप्प राहणं
💓💓💓💓
आणि रात्री कुढत जागणं.
आता मलाही लागलंय जमायला
तुझ्यासारखं वागणं
समोर असलं की गप्प राहणं
आणि रात्री कुढत जागणं.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.
कृपया टिप्पणी बॉक्स में कोई स्पैम लिंक दर्ज न करें।